जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । |
जळगाव जिल्ह्यातील १ हजार १४४ महसूल कर्मचारी ४ तारखेपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांच्या विवीध प्रलंभीत मागण्यापुर्ण व्हाव्या हि त्यांची मागणी आहे. यात चाळीसगाव प्रांत व तहसील कार्यालयातील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने आठवड्याभरात दुसऱ्यांदा महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले अाहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना कामाविनाच माघारी परतावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्चपासून साखळी आंदोलन सुरू करण्यात अाले होते. त्या अंतर्गत जेवणाच्या सुटीत निदर्शने तसेच घंटानादासह काळ्या फिती लावून कामकाज केले जात हाेते. तरीही शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्याने कर्मचाऱ्यांनी २८ मार्चला एक दिवसाचा संप पुकारला होता. या वेळी ४ एप्रिलपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला हाेता. |