---Advertisement---
भुसावळ

भुसावळात गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक

bhusaval
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ ।  पोलिस अधिकार्‍यांना मुंबईतून दरमहा 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट देणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने शहरातील गांधी पुतळ्याजवळ  आंदोलन केले. गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात तीव्र निदर्शने करुन त्यांनी तत्काळ राजीनामाची मागणी आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी आदींनी केली.

bhusaval

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी आरोप केले आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या पत्रात देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. यामुळे भाजपने आक्रमक होऊन देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शहरातील आमदार संजय सावकारेंसोबत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गांधी पुतळ्याजवळ देशमुख यांच्या विरोधात तीव्र निदर्शन आंदोलन केले. त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी आमदार सावकारे यांनी केली.

---Advertisement---

या प्रसंगी ओबीसी सेलचे माजी प्रदेश चिटणीस अजय भोळे, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, अजय नागराणी, सतीश सपकाळे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, अ‍ॅड.प्रकाश पाटील आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---