बकऱ्यांची चोरी करणारी टोळी अटकेत, ६ गुन्ह्यांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । बकऱ्यांची चोरी प्रकणी पारोळा पोलीसांत दाखल गुन्ह्यातील टोळीला अखेर पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांनी तब्बत १७ चोऱ्यांची कबुली दिली आहे. यातील ६ गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.
आरोपी महेंद्र उर्फ गणेश सुदाम पाटील (वय २८), वाल्मिक भगवान मराठे (वय-२४), संजय सोमा जाधव (वय-२७), अंकुश नेहरू पाटील (वय-२३), रोशन महावीर पवार (वय-१९) सर्व रा. पळासखेडा ता. पारोळा आणि शिवाजी रामराव पाटील (वय-२५) रा. जामोद ता.जि.जळगाव यांच्यासह दोन अल्पवयीन मुले यांना पारोळा पोलीसांनी अटक केली आहे. शहरातील भैय्याा सुदाम चौधरी यांच्या वंजारी शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी २५ बकऱ्यांची चोरी झाल्याचे १ ऑगस्ट रोजी उघडकीला आले. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने जप्त करण्यात आले आहे. सर्वाना पारोळा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी एकुण १७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यातील ६ गुन्ह्यांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, आयपीएस ऋषीकेश रावले, विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पो.नि. रामदास वाकोडे, पीएसआय राजू जाधव, शेखर डोमाळे, जयवंत पाटील, पोहेकॉ. सुनील वानखेडे. पो.कॉ. प्रवीण पाटील, पोलीस नाईक संदीप सातपुते, पोकॉ किशोर भोई, पोकॉ अभिजित पाटील, पोकॉ राहुल कोळी, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ हेमचंद साबे यांनी कारवाई केली.