⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | पोलिसांनी पकडले घबाड, १३ लाखांचा गांजा जप्त

पोलिसांनी पकडले घबाड, १३ लाखांचा गांजा जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । चाळीसगाव ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव शहरात वाहनांची तपासणी सुरु होती. शहरातील विराम लॉन्स समोर हि कारवाई सुरु होती. यावेळी त्यांनी तब्बल १३ लाखांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी हे संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार १८ एप्रिल रोजी संध्याकाळी विना नंबर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी तपासणी दरम्यान एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. त्यावेळी गाडीत उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात बेकायदेशीर विक्रीसाठी असलेला मुद्देमाल १३ लाख ३६ हजार चारशे रुपये किंमतीचा ६२.०६६ किलो वजनाचा गांजा मिळून आला. त्यावर ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखा अधिकारी व कर्मचारी यांनी सदर मुद्देमाल हस्तगत करून तुषार अरूण काटकर (वय-२८ रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल देविदास बेडीस्कर (वय-३८ रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश चव्हाण, वाहतूक शाखेचे पोहेकाँ श्रीराम पोपट बोरसे, पोना सचिन देविदास अडावदकर, पोना बापू काशिनाथ पाटील, पोना दिपक पितांबर पाटील, पोना नरेंद्र महादू पाटील, चालक पोहेकॉ रावसाहेब नामदेव पाटील त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीणचे पोना शांताराम सिताराम पवार, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना देविदास संतोष पाटील, पोना दिनेश विक्रम पाटील, पोना प्रेमसिंग नरसिंग राठोड व चालक सफौ अनिल आगोणे आदींनी केली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह