गुन्हेजळगाव जिल्हा

पॅरोल रजेवर आलेले तीन कैदी पसार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । कोरोना काळात नाशिक कारागृहातून रजेवर आलेले तीन कैदी पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुक्ताईनगरसह निंभोरा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु. येथील राजू उर्फ राजेंद्र बळीराम बोरसे हे यांना कोरोना रजेवर सोडल्यानंतर त्यांनीदि. २१ मे पर्यंत नाशिक कारागृहात रजा संपल्यानंतर परतणे गरजेचे होते. मात्र, ते न परल्याने या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे सूर्यकांत विठ्ठल पाटील (वय ४७, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि २२४ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत राजू उत्तम बेलदार (कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर) हे देखील घरी रजेवर आल्यानंतर दि. २ जूनपर्यंत परतणे गरजेचे असताना न परतल्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे सूर्यकांत विठ्ठल पाटील (वय ४७, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत मधुकर धुमा गाढे (विवरा बु., ता.रावेर) हे पॅरोज रजेवर आल्यानंतर दि.१३ जूनपर्यंत कारागृहात परतणे गरजेचे होते मात्र न परतल्याने निंभोरा पोलिसात सूर्यकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार भादंवि २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button