⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यात शरद पवार यांच्या घरावरील हल्याचा निषेध

पाचोऱ्यात शरद पवार यांच्या घरावरील हल्याचा निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । पद्मविभूषण मा शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर काही लोकांकडून भ्याड हल्ला करण्यात आला, या हल्लेखोरांचा आम्ही पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जाहिर निषेध करण्यात आला.यावेळी भ्याड हल्लेखोरांमागे कोणती राजकीय शक्ती आहे ? याचा त्वरीत शोध घ्यावा, याची सखोल चौकशी करावी व या भ्याड हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कडक अशी कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात ते असे कृत्य पुन्हा करणार नाही. या मागणीचे निवेदन पाचोरा पोलिस प्रशासनास व तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संभाजी पाटील यांना देण्यात आले.

यावेळी  माजी आमदार दिलिप वाघ, गटनेते संजय वाघ ,तालुकाध्यक्ष विकास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितिन तावडे, शहराध्यक्षअझर खान, नगरसेवक वासुदेव महाजन. अशोक मोरे, सतीश चौधरी, प्रकाश भोसले, युवकांचे सुदर्शन सोनवणे, महिला पदाधिकारी रेखाताई पाटील, रणजित पाटील, वासुदेव माळी, बशीर बागवान, योगेश पाटील, नाना देवरे, शशिकांत चंदिले, सुदाम वाघ, एस टी अहिरे, शेख रसूल, माणिक पाटील,भगवान मिस्त्री, रणजीत पाटील, ए .बी. अहिरे, ऍंड अविनाश सुतार, अनिल सावंत गाळण, बी एस पाटील, विजय पाटील, आर एस पाटील, एस आर माने, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जोरजोरात घोषणा देण्यात आल्या व हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई बाबत निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

author avatar
टीम जळगाव लाईव्ह