nashirabad news-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात अत्याचार, विनभंगाचे प्रमाण वाढले असून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी संबध ठेवत ७ महिन्याची गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी दि. १२ रोजी नशिराबाद पोलिसात फिर्याद दिली. संशयित आरोपी विशाल तानाजी पवार रा. धावडा ता. भोकरदन जि. जालना याने पीडित १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी संबंध प्रस्थापित करत तिला सात महिन्याची गर्भवती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित आरोपी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.







