जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह करतो असं सांगत दुचाकी लंपास केल्याचा प्रकार जळगाव शहरात घडला आहे. जळगाव शहरातील वाघनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर झाल अस कि, जळगाव शहरातील विवेकानंदनगर परिसरात राहणारा अक्षय रमेश मोरे वय 22 हा व्यावसायिक आहे. त्याची एम.एच.१९ डी.एल.४५९८ या क्रमाकांची दुचाकी विकायची होती. यामुळे त्याने याबाबत OLX या ऑनलाईन वेबसाईटवर दुचाकीबाबतची माहिती दिली. १७ मे रोजी ओएलक्सवरील माहितीनुसार कुणाल राजपूत नामक एक तरुण रिक्षाने शहरातील वाघनगर परिसरात आला. दुचाकी खरेदी करायची असल्याने सांगत त्याने दुचाकीमालक अक्षय यास संपर्क साधला व जी दुचाकी विक्री करायची आहे, ती घेवून वाघनगर परिसरात यावयास त्याने सांगितले. अक्षय त्याची दुचाकी घेवून वाघनगरात पोहचला. दुचाकी खरेदी करायला आलेला कुणाल याने दुचाकी चालवून बघायची असे सांगितले. त्याच्यासोबत अक्षय हा सुध्दा मागे बसून गेला. त्यानंतर कुणाल याने पुन्हा दुचाकीचा स्पीड चेक करायचा असल्याचा बहाणा केला. व एकटाच दुचाकी घेवून गेला. व पुन्हा परत आलाच नाही.
दोन दिवस उलटूनही तरुण दुचाकी घेवून परत न आल्याने अक्षय याने गुरुवारी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रारीवरुन ४० हजार रुपयांची दुचाकी घेवून तिचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी कुणाल राजपूत व एक अज्ञात तरुण अशा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील हे करीत आहेत.