दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यात

मार्च 29, 2021 2:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । जळगाव शिवाजीनगर हुडको परिसरात घरफोडीच्या प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीला शहर पोलीसांनी मध्यरात्री गस्त असतांना अटक केली.

arrested

हकीम नूर मोहंमद शहा (वय २१) रा. गेंदालाल मिल असे संशयित आरोपीचे नाव असून गेल्या दोन महिन्यांपासून फरार झाला होता. त्याला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संशयित रित्या फिरतांना अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी हुडको परिसरात घरफोडी करण्याच्या प्रत्नात असलेल्यांचा कट परिसरातील नागरिकांनी उधळून लावल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. यात दोन चोरट्याना नागरिकांनी रंगेहाथ पकडून चांगला चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर संशयित आरोपी हकीम नूर मोहंमद शहा हा घटना घडल्यापासून फरार होता. हकीम शहा हा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राधाकृष्णनगर परिसरात संशयित रित्या फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे तेजस मराठे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ योगेश इंधाटे व होमगार्ड यांना सोबत घेत हकीम शहाला अटक केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now