दादावाडी स्टॉप देतोय अपघाताना आमंत्रण!
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । शहरातील खोटे नगर ते बेंडाळे स्टॉप उड्डाणपूल खाली असलेल्या दादावाडी स्टॉप नजीकच्या अंडरपासला लागून असलेला सर्विस रोड बांधून सहा महिने देखील उलटे नाही, तोवर रस्त्याची बिकट दुर्दशा झाली आहे. त्या ठिकाणी भले दोन मोठे खड्डे पडलेले आहेत, व ते पास करताना नागरिकांची खूप अशी दमछाक होते आहे. त्यामुळे या खड्ड्यात पडून कोणाचा जीव जाईल हे नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार केली. मात्र, लोकप्रतिनिधींकडून दखल घेण्यात आली नाही.
या खाड्यांमुळे झालेल्या नागिरकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष कुंदन यादवराव सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांकडे मदतीचा हात मागितला, तसेच आमचे कोणी ऐकेल का? व आमच्या जीवाची किंमत इतकी काडीमोल आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, यात्काळ यावर उपाय योजना करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगराध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र आंदोलन शेडू असा इशारा देण्यात आला.