⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तुलना आणि स्पर्धा यामुळे जीवनातील आनंद नष्ट होतोय – डॉ. सोमनाथ वडनेरे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । आनंदी कट्टा निर्मित इंद्रधनू-2022 या कार्यक्रमाचे अनोखे आयोजन कोथरुड येथील उत्सव मंगल कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटन सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. वडनेरे पुढे म्हणाले की, आधुनिक जगात प्रत्येक क्षेत्रात होत असलेली अनावश्यक तुलना आणि पाय खेेचणारी, गळेकापू स्पर्घा यामुळे जगण्यातील खरा आनंद हिरावून गेला आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आणि क्षमता ओळखून, आहे त्या क्षेत्रात समाधानी आणि प्रगतीशील वृती ठेवल्यास निश्चित जीवनातील मौज अनूभवता येईल.

तत्पूर्वी प्रास्ताविक करतांना इंद्रधनू कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. शितल डोलारे यांनी सांगितले की, नेहमीच्या धावपळीच्या जगण्यातील थोडा वेळ विविध कला, गुण, शक्ति आत्मसात करणास द्यावा त्यातूनच विविध कौशल्ये वृद्धीगत व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी त्यांनी दोन वर्षापासून होत असलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा आढावा घेतला.

आपल्या उदघाटनपर संबोधनात ब्रह्माकुमारी पारुदीदी, पुणे यांनी म्हटले की, परमेश्वराची जगातील सर्वात सुंदर आणि सर्वोच्च रचना म्हणजे मानव होय. परमेश्वराने आपले गुण आणि शक्ति मानवास प्रदान केलेल्या आहेत मात्र तो त्या विसरला आहे. या गुणांना पुन्हा स्मरुन जीवन दैवी गुणांना फुलविण्याचे काम या उपक्रमाच्या निमित्ताने होत आहे. भारतातील सर्वच व्यक्ती आनंद कट्ट्याच्या सदस्यांप्रमाणे आनंदी रहाव्यात असा आशावादही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

याप्रसंगी बी.के. निरुदीदी यांनी सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, स्नेह, सदाचार या आत्म्याचा सप्त गुणांचा परिचय करून दिला. बी.के. कौशल्यादीदीनी आत्म्याचे वास्तविक रुप आणि परमात्म्याकडून आनंद, शक्तिची प्राप्त कशी करता येईल त्याकरीता राजयोग अनुभूती या प्रसंगी उपस्थितांना करवून दिली.

विविध कला, गुण दर्शनाच्या कार्यक्रमात खुशीयों का बाजार नाट्यातील कलाकारांचे सादरणीकरणाने उपस्थितांकडून टाळ्या मिळविल्यात. एक गुण जर मिळविण्याच्या प्रयत्न केल्यास अनेक सदगुण त्याबरोबर ओघाने येतात अर्थात फ्रि मिळतात असा संदेश यातून दिला गेला. मुग्दा, स्नेहल, शोभना, उषा, तृप्ती, प्राजक्ता, गौरी, वासंती, मेघना, शुभदा आणि अभय यांनी यात सहभाग नोंदविला. लेखन व दिग्दर्शन डॉ. शितल डोलारे यांचे होते.

याप्रसंगी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने दर्शकांनी सप्तरंगी आनंदाची अनुभूती केली. यात प्रामुख्याने पुढील सादरीकरणांचा समावेश होता. कविता सादरीकरण सौ. आशाताई मेलग यांनी केले. हीच आमची प्रार्थना अन हेच आमूचे मागणे ही प्रार्थना वंदना, मुग्धा, शुभदा, शितल आदिंनी सादर केली. आत्मदर्शन नाटिकेत आत्म्याच्या 7 गुणांचे दर्शन घडले हे सादरीकरण यांनी केले. लेखन व दिग्दर्शन डॉ. शितल डोलारे यांचे होते. आशा मेलग यांनी आनंद - अंतरीचा ही नाटीका सादर केली. आनंदी कट्याचा अनुभव सौ. मिना पाध्ये व सौ. प्राजक्ता यांनी सादर केला. सौ. तृप्ती भीडे यांनी अच्युत्तम केशवम् हे गीत सादर केले.नथ मी केली ग बाई या दर्शनीय भारुडाचे सादरीकरण प्राजक्ता, शुभदा, स्नेहल, वंदना, उषा यांनी केले. लेखन व दिग्दर्शन डॉ. शितल डोलारे यांचे होते. अष्टशक्ति दर्शन यात राजयोगाद्वारे प्राप्त अष्टशक्त्तिंचे सादरीकरण करण्यात आले. मेघना, गौरी, आशा, वंदना, मुग्धा, मानसी, मीना यांनी यात सहभाग नोंदविला. अनंत फंदीचा फटका हे गाणे सौ. वैजयंती आपटे यांनी सादर केले. हॅप्पीनेस बद्दल सौ. सुजाता आपटे यांनी मनोगत मांडले.