⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | बातम्या | तुम्हाला सुद्धा आहे ‘पफी आईज’चा त्रास? हे आहेत घरगुती उपाय

तुम्हाला सुद्धा आहे ‘पफी आईज’चा त्रास? हे आहेत घरगुती उपाय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । सकाळी उठल्यावर अनेक लोकांचे डोळे सुजलेले, फुगलेले दिसतात. त्यास पफी आईज असे म्हणतात. त्यामुळे तुमचा लूक बदलतो. म्हणजेच तुम्ही विचित्र दिसता. तुमाला सौंदर्यात बाधा निर्माण होते. यामुळे तुम्ही काही घरगुती गोष्टी केल्या पाहिजे ज्यामुळे तुम्हाला हा त्रास होणार नाही. (Puffy Eyes home made care)

पफी आईजची समस्या रात्री उशिरा झोपल्याने, ताण तणावामुळे, चुकीच्या आहारामुळे, तासन्तास कॅम्प्युटर, मोबाइलसमोर बसल्याने होते. या समस्येने तुम्हीही त्रासलेले आहात असे तुम्हाला वाटत असेल तर, या घरगुती उपायांनी तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता आणि पफी आईज मुक्त होऊ शकता.

पफी आईजची समस्या असल्यास सकाळी उठून चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोड्यात एक चमचा थंड पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्याला ऑईल फ्री क्रिम लावा.

पफी आईजपासून सुटका मिळवण्यासाठी चिमूटभर काळीमिरी पावडर, एक चमचा कॉफी, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि थोडेसे पाणी घालून मास्क तयार करा. हा मास्क डोळ्यांच्या खाली लावा. १० मिनिटांनंतर कपड्याने किंवा टिशूने नीट पुसून घ्या. पफी आईजसोबतच डार्क सर्कल्सची समस्याही दूर होण्यास मदत होईल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह