⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तीन क्विंटल फुलांचा ‘तो’ हार आणि शरद पवार यांच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा फारच उत्साहात पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये एकच उत्साहाची लाट पसरली होती. तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’ जळगाव जिल्ह्यात येणार असल्याने सगळेच भलतेच खुश होते. मात्र पवारांनी आपल्या आयुष्यात अवलंब केलेले ‘ते’ तत्व, त्यांची शिकवण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते किंबहुना राष्ट्रवादी युवा सेनेचे कार्यकर्ते विसरले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचं कारण म्हणजे खासदार शरद पवार यांचं जळगाव शहरात केवळ दोन मिनिटांसाठी का होईना पण झालेले जंगी स्वागत. आपल्या पक्षाचा अध्यक्ष आपल्या शहरात येतो तेही तब्बल दोन वर्षांनी अशावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं हे सहाजिकच आहे. पक्षाचा आपला अध्यक्ष आला म्हणजे घोषणाबाजी होणार हे सहाजिकच. आपल्या अध्यक्षाला आपल्या कामातून इतके खूश करायचा की, त्याची पावती आपल्याला मिळायला हवी हे इच्छा बाळगून नाही काही चुकीचं नाही. मात्र दोन मिनिटाच्या भेटीसाठी अध्यक्षा साठी तब्बल तीन क्विंटलचा हार बनवून घेणार योग्य होतं का? तीन क्विंटल फुलांचा हा हार जितक्या किमतीत बनेल तितक्याच किमतीचा समाजकार्य करण शक्य नव्हता का ?

यासाठी शरद पवार साहेबांच एक उत्कृष्ट उदाहरण. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे 1991 साल लग्न झालं. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आजकालचे साधे नगरसेवकही आपल्या मुला मुलींची लग्न अशी काही लावून देतात की बघायलाच नको मात्र 1991 साली शरद पवार स्वतः मुख्यमंत्री असताना देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लग्नात घरापुढे एका मांडवा व्यतिरिक्त अजून इतर कोणताही तामझाम केला नव्हता. याचं कारण होतं त्या काळी आलेला दुष्काळ. दुष्काळात आपल्या मुलीचं लग्न लागणार योग्य ठरणार नाही असं पवार यांचं ठाम मत होतं.

आजची जळगाव शहरातली परिस्थितीही बघायला गेलो तर काही वेगळी नाही. जळगाव शहरात इतरत्र अशी कितीतरी नागरिक दिसतील ज्यांची दोन वेळेस जेवायची सुद्धा ऐपत आहे. त्यांना दारिद्र्याने इतक ग्रासल आहे की ते अंगावर चांगले कपडेही घालू शकत नाही. अशा भारतीय नागरिकांना राष्ट्रवादीचे हे उत्साही कार्यकर्ते मदत करू शकत नव्हते का? आणि सहाजिकच असा प्रश्न विचारला की त्यांच्याकडून कशाप्रकारे त्यांनी आजपर्यंत समाज कार्य केले हे सांगितलं जाईल मात्र तीन क्विंटलचा हार घेण्यापेक्षा तितक्याच पैशात जरा समाज कार्य करता आलं असतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे