जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रोडचे काम ४२ कोटींच्या निधीतून सुरु होत असल्याने त्यापुर्वी महापालिकेकडून गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली. यावेळी रस्ता तयार करण्यास ज्या अडचणी असतील त्या रस्त्याचे काम सुरु होण्यापुर्वी पुर्ण करा, रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्ता खोदला तर, संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून सर्वच रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तातडीने रस्त्यांचे काम मार्गी लावण्याची आवश्यकता असतांना निधी मंजूर असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व मक्तेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सां.बा.विभाग, महापालिका व मक्तेदार यांची बैठक घेवून रस्त्यांचे काम तातडीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या. तसेच मक्तेदाराकडून दिरंगाई होत असल्यामुळे मक्तेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मक्तेदार काम सुरु करण्यास तयार झाला असून सर्वांत आधी गणेश कॉलनी रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मनपाकडून कोर्ट चौकातील यांनी दिला आहे.
गटारीचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली व मनपा अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम सुरु होण्यापुर्वीच पाईपलाईन व गटारींचे काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. तसेच रस्ता झाल्यानंतर जर पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे किंवा गटारीचे काम अपुर्ण आहे त्यासाठी रस्ता खोदावा लागेल असं कोणी सांगितलं तर, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.