⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Jalgaon : गौतमी पाटलाच्या आडनावाबाबत छत्रपती संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२३ । राज्यात सध्या गौतमी पाटील आणि तिच्या आडनावावरून मोठा वाद सुरु आहे. गौतमी पाटीलने यापुढे पाटील हे आडनाव वापरू नये, अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. आता यावर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे, असंं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या कलेचं समर्थन केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती हे रविवारी सायंकाळी जळगावात आले होते. एका माध्यमाच्या वधार्पनदिनानिमित्ताने त्यांच्या प्रकटमुलाखतीच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिले पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. लोक या अशा राजकारणाला कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा, यासाठी लोक अपेक्षा करत आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.