जळगाव जिल्हा

ठाणेकर विरुद्ध मुंबईकर ! बंडाच्या तिसरा दिवशी घडलेल्या मोठ्या घडामोडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ ।  शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचे म्हटले जात असून राज्यातील सत्ता पालट होणार हे निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. शिंदेंनी केलेलं बंड हे आतापर्यंतच शिवसेनेतलं सगळ्यात मोठं बंड ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंडाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईसह गुवाहाटीमध्येही घडामोडींना वेग आला आहे. महत्त्वाच्या तीन घडामोडी बंडाच्या तिसऱ्या दिवशी समोर आल्या आहेत.

पहिली : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सेंट रेगिसमध्ये मुंबीतील शिवेसना आमदारांना हलवण्यात आलं होतं. या आमदारांची सकाळी बैठक होणार आहे. सकाळी 11.30 वाजता आमदारांची बैठक पार पडेल. दरम्यान, शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी नेमणूक केलेले अजय चौधरी ठाण मांडून होते. आता आज होणाऱ्या बैठकीत नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचंय.


दुसरी : शिवसेनेचे खंदे समर्थक सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झालेत की काय? अशीही शंका घेतली जातेय. सध्या सरवणकर आणि कुडाळकर हे नॉट रिचेबल असल्यानं संशय व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे आणखी तीन आमदारांची भर एकनाथ शिंदे गटात पडली आहे. बंडाच्या तिसऱ्या दिवशी शिंदेंची ताकद अधिक वाढली, असल्याचं बोललं जातंय. दादा भुसे, संजय राठोड, दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अधिकच खळबळ माजलीय.


तिसरी : एकनाथ शिंदे गटातून परतलेल्या नितीन देशमुख हे आज सकाळी मुंबईत दाखल झालेत. ते आज मुंबई मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यताय. आम्ही शिवसेनेत होतो आणि नेहमी राहू, असंही ते म्हणालेत. तसंच शिवसैनिकांच्या भरवशावर निवडून आलेले सर्व आमदार परत येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

Related Articles

Back to top button