जळगाव जिल्हारावेरशैक्षणिक

जि.प.मराठी शाळांचे संवर्धन करण्याची गरज!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खेडे भागातील जि.प मराठी शाळा ओस पडल्याचे चित्र दिसून आले आहे. ऐकीकडे राज्य शासन मराठी संवर्धनासाठी नवनविन धोरणे प्रकल्प आखत आहे. मात्र बालभारतीच्या व राज्यातील जि.प. मराठी शाळांकडे कोणतेही शैक्षणिक दृष्ट्या विकासात्मक धोरण आखत नसल्यामुळे जि.प.शाळांवर ही वेळ येत असावी का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुक्यातील खिर्डी’सह परिसरात वघाडी, रेंभोटा, भामलवाडी, पुरी गोलवाडा यांसारख्या खेडे गावातील कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये जि.प मराठी शाळा ओस पडलेल्या असून विद्यार्थी संख्या पाच टक्क्यांवर आली आहे. पालकवर्ग जवळ असलेल्या सावदा, रावेर, फैजपूर या शहरी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवत असल्याने स्थानिक पातळीवरील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येत आहे. ऐकीकडे राज्य शासन मराठी संवर्धनासाठी नव नविन धोरणे प्रकल्प आखत आहे. मात्र बालभारतीच्या व राज्यातील जि.प. मराठी शाळांकडे कोणतेही शैक्षणिक दृष्ट्या विकासात्मक धोरण आखत नसल्यामुळे जि.प.शाळांवर ही वेळ येत असावी का ? असा प्रश्न उपस्थित होत असून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दुकानावरील मराठी पाट्या सक्तीचे करण्याबरोबर मराठी शाळा ही सक्तीने गावा-गावात गोरगरीब जनतेच्या हीतासाठी सक्तीने सुरू करण्यात यावी अशी मागणी ही ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Back to top button