⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

संशोधनात पेटंट मिळवण्यामध्ये गोदावरी अभियांत्रिकी अव्वल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्यक असते.पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकेतील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांना विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी इंडियन पेटंट, डिझाईन पेटंट, कॉपीराइट्स तसेच इतर देशातील पेटंट हे बहाल करण्यात आले आहे. आणि यामुळेच इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) मध्ये महाविद्यालयाला स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयाची संशोधनामध्ये निरंतर प्रगती व्हावी यासाठी प्राध्यापक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतो.तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नामांकित पब्लिकेशन च्या मार्फत विविध पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.

image
संशोधनात पेटंट मिळवण्यामध्ये गोदावरी अभियांत्रिकी अव्वल 1

महाविद्यालयातील प्राध्यापकांना मिळालेले पेटंट्स यंत्र विभाग डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) १ डिवाइस फॉर लेझर मशीनिंग ऑन थिक मटेरियल २ लेझर बिम मशीनिंग फॉर अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅलॉय प्रा.किशोर महाजन ए मॉडिफाइड मायका बँड हिटर, संगणक विभाग प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. वेलचंद होले, प्रा. निलेश वाणी प्रा. महेश एन पाटील, प्रा.निलेश चौधरी एम एल बेस्ड सेक्युर्ड स्टॉक मार्केट प्रेडीक्शन डिवाइस,प्रा. देवपाल यादव, अ‍ॅडव्हान्सड सेन्टेन्स जनरेशन टेक्निक युजिंग डीप लर्निंग अल्गोरिदम्स, विद्युत विभाग प्रा. महेश एच पाटील, विंड अँड सोलर पॉवर चार्जिंग स्टेशन, इ अँड टीसी विभाग प्रा. शफिकुर रेहमान एस अहमद, वायरलेस मेसेंजर, प्रा.विजय डी चौधरी, एन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बेस्ड ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स विभाग डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा एआय बेस्ड इनडोअर एअर प्यूरिफिकेशन डिवाइस, रीडीफायनिंग स्पेक्ट्रम मॅनेजमेंट: डायनॅमिक एलोकेशन अँड काग्नेटिव्ह सोल्युशन्स इन वायरलेस नेटवर्क,अचीविंग ऑप्टिमल सर्विस कॉलिटी इन सेल्युलर नेटवर्क स्ट्रॅटेजीस फॉर क्यूओएएस इन्हेंसमेंट, इन्हेंसिंग बीट एरर रेट परफॉर्मन्स इन ओएफडीएम सिस्टीम थ्रू ऑप्टिमाईज ऍडॉप्टीव्ह कोडींग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स,

टेक्निक्स यंत्र विभाग (तंत्रनिकेतन) प्रा. कैलास मखीजा,ट्राय सायकल, सेल्फ ऑपरेटेड प्रोटेक्शन डिवाइस, प्रा. कैलास मखीजा, प्रा.वेणू फिरके स्मार्ट लॅडर,तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचे नामांकित पब्लिकेशन मध्ये लिखाण प्रकाशित झाले आहे. यात डॉ. हेमंत नेहेते, डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. प्रवीण पाटील,डिझाईन अँड अनालिसिस ऑफ लिफ स्प्रिंग,डॉ. हेमंत नेहेते, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन ऑफ चाफ कटर प्रा. हेमराज धांडे, प्रा. महेश कुमार एन पाटील, प्रा. विजय डी चौधरी, प्रा. हरीश पाटील,इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप प्रा. विजय डी चौधरी, प्रा. हेमराज धांडे, प्रा.राजेंद्र व्ही पाटील, डॉ. हेमंत इंगळे एमबेडेड सिस्टिम्स अँड आयओटी प्रा. विजय डी चौधरी, डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा, प्रा. महेश कुमार एन पाटील, प्रा. निलेश चौधरी,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

या यशस्वी प्राध्यापकांचे उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील,उपाध्यक्ष सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील व हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी अभिनंदन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून महाविद्यालयांमध्ये संशोधनाला जास्तीत जास्त गती व चालना देण्यासाठी प्राध्यापक वर्गांची सतत संपर्क ठेवून त्यांना प्रोत्साहन देत राहणार असल्याचे सांगितले.