⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | जिल्ह्यात भारतीय किसान संघाचे दोन दिवसीय कापूस परिषदेचे आयोजन

जिल्ह्यात भारतीय किसान संघाचे दोन दिवसीय कापूस परिषदेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । जिल्ह्यात भारतीय किसान संघातर्फे दोन दिवसीय कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावल येथे १९ रोजी तर चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २१ रोजी आयोजित या परिषदेत भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे संघटन मंत्री दादा लाड मागदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी दिली.

जळगाव जिल्हा भारतीय किसान संघातर्फे कापूस उत्पादकांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबत तसेच कापूस उत्पादकांच्या अडीअडचणी या विषयांवर उहापोह करण्यासाठी कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ रोजी सकाळी ९ वा. चिंतामणी इंडस्ट्रीज, यावल चितोडा रस्ता येथे या कापूस परिषदेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी घनःश्याम शिंदे (९८९०३९८३२२), तेजस गडे (८३२९१६७३४३)यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर २१ एप्रिल रोजी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे विजय रसवंती गृह, चाळीसगाव भडगाव रस्त्यावर कापूस परिषद सकाळी ९ वा. होणार आहे. त्यासाठी रामदास माळी (९५५२६६५८०२), विकास चौधरी (९४२२७८१२९७) यांच्याशी शेतकर्‍यांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कापूस परिषदांमध्ये कापूस उत्पादक शेतकर्‍यांना किसान संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे संघटन मंत्री लाड हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहे. लाड हे कापूस लागवड व एकरी सुमारे ४० क्विंटल उत्पादन कसे घेता येईल याचे सखोल मार्गदर्शन करतात. त्यांच्या कापूस लागवड मार्गदर्शनाचे हजारो शेतकर्‍यांना महाराष्ट्रात उपयुक्त ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातही त्यांच्या पद्धतीने कापूस लागवड करुन भरघोस फायदा मिळविणारे शेतकरी आहेत. त्यांच्या या ज्ञानाचा शेतकर्‍यांना अधिकाधिक फायदा व्हावा म्हणून त्यांना विशेष आमंत्रीत केले गेले आहे. या मार्गदर्शनात शेतकर्‍यांच्या प्रश्नांना देखील आपल्या अनुभवाने उत्तरे लाड देणार आहेत.

या कापूस परिषदांना उपस्थित राहू इच्छीणा-या शेतकर्‍यांनी १७ एप्रिल पर्यत संबधितांकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, मंत्री डॉ.दिपक पाटील, उपक्रम प्रमुख महेश गडे, जिल्हा प्रचार प्रमुख रामदास माळी व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह