जिल्ह्यातील ३९८ हिस्ट्रीशीटर दहा दिवसांसाठी हद्दपार
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील ३९८ हिस्ट्रीशीटरला ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यातील दिली. ८० जण जळगाव शहरातील आहेत. अजूनही पाचोरा, जामनेर व वरणगाव येथील १३ हिस्ट्रीशीटरचे प्रस्ताव वेगवेगळ्या प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.
गणेशोत्सवाला गालबोट लागू नये हा उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, उपद्रवी ठरलेल्यांची कुंडली काढली होती. जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यांपैकी जिल्हा पेठ वगळता ३४ पोलीस
ठाण्यांनी यादी तयार करून प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे पाठविले होते. मुंढे यांनी पडताळणी करून या प्रस्तावाला मंजुरी त्यानंतर जिल्ह्यातील प्रांताधिकाऱ्यांकडे हे प्रस्ताव रवाना झाले होते. ३१ ऑगस्टपर्यंत ३९८ जणांना हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले व सायंकाळपर्यंत या सर्वांना नोटिसा बजावून जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले. या सर्वांना ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. याच काळात गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांना टोळीने दोन वर्षासाठी तर काहींना सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.