⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

एका रात्रीत पक्ष बदलणे माझ्या रक्तात नाही ; माजी खासदार ए.टी.पाटीलांचा उन्मेष पाटीलांवर टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयाराम सुरुच असून उमेदवारी न मिळालेले लोक दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहे. यातच जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांचे कट्टर समर्थक करण पवार यांच्यासह भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर उन्मेष पाटीलांवर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. यातच जळगावचे माजी खासदार ए.टी. पाटील यांनी देखील उन्मेष पाटलांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले ए.टी. नाना पाटील?
उमेदवारी बदलण्याचा अधिकार पक्षश्रेष्टींना आहे. प्रत्येकाला वाटतं उमेदवारी मिळावी. पण ज्या पक्षाने १० वर्ष आपल्याला दोनदा खासदारकी दिली. एका रात्रीत पक्ष बदलवणे आपल्या रक्तात नाही, असं नाव न घेता ए.टी. पाटील यांनी देखील उन्मेष पाटीलांवर टोला लगावला आहे. मला सुध्दा शिवसेना ठाकरे गटाची ऑफर होती. पण पक्ष बदलवणे माझ्या बुद्धीला पटत नाही. मी गेलो नाही असंही ए.टी.पाटील म्हणाले.

दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आलीय. दरम्यान, यावेळी स्मिताताई यांच्या प्रचार करण्यास तुम्ही पाठीशी आहात का? असा प्रश्न ए.टी.पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पक्ष जी जबाबदारी देऊन ते करावी लागेल, असं माजी खासदार ए.टी.पाटील पाटील म्हणाले