जवखेडे सिमच्या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस एक लाखाचा धनादेश

ऑक्टोबर 20, 2022 6:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम येथील अनिल साहेबराव पाटील या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून १३ मार्च २०२२ रोजी आपले आयुष्य संपविले होते. त्यांच्या कायदेशीर वारस त्यांची पत्नी ज्योतीबाई अनिल पाटील यांना आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शेतकरी आत्महत्या निधीतून सदर आर्थिक सहाय्य करण्यात आले.

jalgoan 33

याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील उपजिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, विठ्ठल वंजारी, रवींद्र जाधव, बबलू पाटील, चिंतामण पाटील, मयूर महाजन, नायब तहसीलदार किशोर महाजन हे उपस्थित होते.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now