जळगाव जिल्हा

जळगाव मनपा महापौरांच्या ताफ्यात ई – कार दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । महानगरपालिकेकडून ईलेक्ट्रीक कार खरेदी करण्यात आली आहे. हे वाहन महापौर जयश्री महाजन यांच्यासाठी खरेदी करण्यात आले आहे.मात्र या नंतर जे कोणते महापौर बनतील ते देखील याचा वापर करणार आहेत.

महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एप्रिल 2022 पासून सरकारने खरेदी केलेली किंवा वापरण्यासाठी भाड्याने घेतलेली सर्व वाहने वीजेवर चालणारी असतील अशी घोषणा केली होती. त्यावेळी ते म्हणले होते कि, “सरकारने सध्या वापरात असलेल्या कारच्या जागी इलेक्ट्रिक वाहने (EV) घेतल्यास मोठे नुकसान होईल. परंतु एप्रिल 2022 पासून सरकारने खरेदी केलेल्या किंवा भाड्याने घेतलेल्या कोणत्याही नवीन कार इलेक्ट्रिक वाहने असतील, याच अनुषंगाने हि कर मनपाने विकत घेतली आहे. यामुळे पर्यावरणाची हानी टाळणार आहे.

१३ लाख २५ हजार रुपये किंमतीची ही कार असून ॲटो गिअर असल्यामुळे कोणालाही सहज चालविता येण्यासारखी आहे. एक वेळा चार्ज केल्यानंतर १६० किलो मीटर पर्यंत ही कार धावत असते. त्यानंतर पुन्हा चार्ज केल्यास पुन्हा १६० किमी चालविता येवू शकते. वाहन विभागाचे कोअरमन बाळासाहेब लासूरे व चालक संजय बागुल यांनी ही कार औरंगाबादवरुन जळगाव मनपात आणली असून या वाहनाची आरटीओकडील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर महापौर महाजन यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button