---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा जळगाव शहर

चिमुकल्यासह आढळली मूकबधीर महिला, वारसाचा शोध घेण्याची विनंती

---Advertisement---

pink auto 1 jpg webp webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मुकबधीर महिला एका लहान बाळासह दि.२३ मार्च २०२२ रोजी मिळून आली आहे. महिलेच्या वारसाचा जिल्ह्यात शोध घेतला असता कुणीही मिळून आले नसून नातेवाईक किंवा इतर वारसांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.

---Advertisement---

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२३ मार्च २०२२ रोजी एक मूकबधीर महिला मिळून आलेली आहे. पोलिसांनी मुक बधीर महिलेसह लहान बाळाला शासकीय आशादीप महिला वसतीगृह, जळगाव येथे दाखल केलेले आहे.

मूकबधीर महिला ही ३५ ते ४० वयाची असून तिचा रंग गोरा, शरिराने सडपातळ, उंची ५ फुट २ इंच, तिचे उजव्या हातावर रेवती हे नाव गोंदलेले असून डाव्या हातावर ‘ठेरनीमो आजगीया’ असे गोंदलेले आहे. तिचे सोबतचे लहान बाळ हे सुमारे ३ वर्षांचे आहे. जळगाव जिल्ह्यातील हरविलेल्या व्यक्तीचे रेकॉर्ड पाहिले असता अशा वर्णना संदर्भात कोणतीही नोंद आढळून आलेली नाही.

जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांपैकी या महिलेस कोणी पाहिले असल्यास किंवा ओळखत असल्यास तिचे वारसास सदर महिलेची माहिती देवून शासकिय आशादीप वसतीगृह, जळगाव या कार्यालयात संपर्क साधण्याबाबत कळवावे. तसेच आपण आपल्या परिसरातील मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राम व इतर सोशल मिडियावर सदर महिलेचा फोटो पाठविल्यास तिचे वारसांचा शोध लावून सदर मूक बधीर महिलेस तिचे वारसाच्या ताब्यात देण्यास मदत होईल. जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.

महिलेबाबत कुणालाही काही माहिती असल्यास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याशी मोबाईल क्रमांक ७३५०५१५८५८ किंवा कार्यालय क्रमांक ०२५७-२२२१७९० यावर संपर्क साधावा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---