---Advertisement---
बातम्या

घरफोडी : 30 हजारांची रोकड लांबवली

---Advertisement---

crime 16 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असून जळगाव शहरातील दौलत नगरातील बंद घरातून चोरट्यांनी 30 हजाराची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

---Advertisement---

भास्कर शंकर पाटील (64, सुदर्शन अपार्टमेंट, दौलत नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शुक्रवार, 1 एप्रिल रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून कपाटातील 30 हजारांची रोकड लांबवली. ही बाब मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार दीपक शिरसाठ करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---