⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल : खा. उन्मेश पाटील 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । कोविड १९ या महामारीत गेल्या वर्षभरापासून ते आजपर्यंत सातत्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांना रात्र दिवस सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या आदेशानुसार त्यांना कर्तव्यावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हा प्रकार म्हणजे “गरज सरो वैद्य मरो” याप्रमाणे वापरून फेकून देण्यासारखा आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत रात्रंदिवस काम केले अशा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे माणुसकीला धरून नाही हे कर्मचारी गेल्या वर्षभरात कुशल झाले असल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे त्यांना आरोग्य विभागाच्या इतर योजनांमध्ये समावेश करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा या कर्मचाऱ्यांसोबत मलाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
आज जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कोविड हंगामी, रोजंदारी कर्मचारी अर्थात हे सर्व कोरोना योद्धे यांना अचानक कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याने हे सर्व 45 कर्मचारी आज खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे आपली समस्या मांडण्यासाठी खासदार जनसंपर्क कार्यालयात उपस्थित झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील यांना दिले. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव, मा. डॉ. अर्चना पाटील आरोग्य संचालक यांना दूरध्वनीवर संपर्क करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे मांडले. खासदार पुढे म्हणाले की नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांनी या कंत्राटी कामगारांचा सारासार विचार करत यांना वेगवेगळे योजनेमध्ये समावून घेण्यात संदर्भामध्ये आदेश दिला असताना जळगाव जिल्ह्यात मात्र या कर्मचाऱ्याना कार्यमुक्त करुन अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी यांच्यावर या आदेशाने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. वास्तविक पाहता हे कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करून गेल्या बारा चौदा महिन्यात कुशल कर्मचारी झाली आहेत. रात्रंदिवस सेवा करणारे कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या मानवी अधिकाराचे संरक्षण करत त्यांना वेगवेगळ्या आयुष्यमान भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच आरोग्य इतर विभागात समावेश करून घ्यावा अशी विनंती वजा सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी राज्य सरकारकडे मांडली आहे. यावेळी कंत्राटी कामगारांनी आपले म्हणणे मांडले अनेक महिला कर्मचारी यांना यावेळी रडू कोसळले होते. या कर्मचाऱ्यांनी अतिशय भावनिक होत खासदार उन्मेश पाटील यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनवणी या कर्मचाऱ्यांनी केली.

यावेळी राहुल पवार, भूषण महाजन, चेतन गुडेकर, मनिषा बागुल, किशोर पाटील, द्वारका लव्हारे, सुवर्णा पवार, मोनिका पाडवी, आम्रपाली म्हसदे, कुंदन माळी, आशाबाई निकम, जयश्री जगदाळे, सोनाली गिरासे, सुनिता कोळी, पूनम जाधव, सुवर्णा मोरे, उज्वला मोरे, योगेश्वरी ठोसरे, ज्योती दळवी, मिताली खेडकर, ललिता पावरा, शमीना इस्माईल, प्रज्ञा लोखंडे, भाग्यश्री जगताप, दीक्षा साळवे, नूतन साळवे, शुभम पाटील, धनंजय पाटील, प्रथमेश नवाळे, विनोद भोसले, वैभव पाटील, दीपक पगार, लक्ष्मण माने, निशांत नवाळे,अविनाश राठोड, धनंजय चव्हाण, प्रशांत कोर,सागर धनगर, संदीप पाटील, ईश्वर पिलोरे, सचिन पाटील,सागर पाटील, गोविंद पाटील, तेजस चौधरी यांच्यासह अनेक कर्मचारी बांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घ्यावे यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे , तसेच माननीय आरोग्य मंत्री व संबंधित विभागांकडे पत्राद्वारे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये यांना आरोग्य विभागाच्या विभागात समावेश करावा अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.