जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । जळगावच्या एसटी आगारात कंत्राटी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांना बुधवारी सकाळी १० वाजेपासून बाेलावण्यात आले हाेते. यासाठी एसटीच्या कार्यालयात सुमारे शंभरहून अधिक उमेदवार आले होते. दुपारी ४ वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. त्यामुळे दिवसभर थांबून असलेले उमेदवार हैराण झाले हाेते.
या भरतीसाठी बुधवारी जिल्ह्यासह जिल्ह्यालगतचे उमेदवारदेखील जळगाव अागारातील कार्यालयात आले होते; मात्र सकाळी १० वाजेपासून कागदपत्रे तपासणीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे दुपारी चार वाजेपर्यंत देखील तपासण्यात न आल्याने अनेक उमेदवार हैराण झाले हाेते. अनेकांनी संताप व्यक्त करून गावाकडे जाण्यास गाडी भेटणार नाही म्हणून घरचा रस्ता धरला. तर काही उमेदवारांनी एसटी अागारातील कार्यालयात अालेल्या ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीजवळ आपली व्यथा मांडली.
परजिल्ह्यातूनही उमेदवार