आनंदवार्ता ! जिल्ह्यात एसटी संप संपल्यात जमा
जळगाव लाईव्ह न्युज |२३ एप्रिल २०२२| गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली लालपरी जिल्ह्यात पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. कारण चार हजार एसटी कर्मचारी पुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर रुजू झाले आहेत.
विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा एसटीचा संप सुरू होता मात्र सदावर्ते गोत्यात अडकल्याने हा संप संपल्यात जमा आहे.
राज्य शासनाने दिलेल्या अल्टीमेटम नंतर आता बहुसंख्य कर्मचारी एसटीमध्ये रुजू झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व सहा हजार फेऱ्या पूर्ववत होणारं असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
संप मिटल्याने मुळे शनिवारपासून जिल्ह्यात विविध आधार मिळून सहा हजार पर्यंत पूर्ण होणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे या मार्गावर रात्रीची ही बससेवा सुरू होणार आहे. त्याच बरोबर ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देखील सुरू होणार आहे.