जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । चार-पाच दिवसांपासून रात्री पाहटे अवेळी तासन तास वीज गुल होत असल्याने विद्यार्थी, कामगार ,रोजेदार, अशा सर्वांना ऐन उन्हाळ्याच्या गरम वातावरणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अशातच रात्री एक वाजता पाळधी येथील वीज गुल झाल्याने येथील युवा सैनिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन झोपण्याचे अनोखे आंदोलन केले. तासाभरानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर युवक आपापल्या घरी गेले गावात सर्वत्र या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी युवा कार्यकर्ते भूषण महाजन यांच्या नेतृत्वात प्रकाश मोरे गौरव महाजन दीपक माळी गणेश माळी यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.