---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

अशी साजरी झाली जळगावातली पहिली शिवजयंती!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात महाराष्ट्र सह जळगाव जिल्ह्यात साजरी होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून जळगावात शिवजयंती रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मात्र जळगावत साजरी होणारी शिवजयंती पहिल्यांदा कशी साजरी झाली? हे तुम्हाला माहिती आहे का? यासाठी जळगाव लाईव्हच्या वतीने माजी सरकारी अधिकारी तथा जेष्ठ जळगावकर शिवाजी भोईटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

thambnail 1 jpg webp webp

1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. त्याच वर्षी जळगावात शिवजयंतीला सुरुवात झाली. जुनं जळगाव म्हणजे भोईटे गडी येथे या शिवजयंतीची सुरुवात झाली होती. सकाळी दहा वाजता या शिवजयंतीची सुरुवात केली जात असे. अक्षय त्रृटीया म्हणजेच आखाजीच्या दुसऱ्या दिवशी मोठी मिरवणूक काढत शिवजयंती साजरी केली जात असे. श्रीराम तरुण मंडळ तर्फे ही शिवजयंती आयोजित करण्यात येत होती. मोठी सजावट करून मिरवणूक काढून हि जयंती साजरी जात असे.

जळगावची जुनी भोईटे गाडी म्हणजेच जुने राम मंदिर इथून हि मिरवणूक निघत असे. कै.रमेश बोईट, राजाबापू शिंदे, वसंतराव भोईटे, प्रकाश जगताप, शिवाजी घाडगे,दादा नेवे यांच्या पुढाकाराने हि मिरवणूक निघत असे. शिवाजी घाडगे यांच्याकडे शिवाजी महाराजांची वस्त्रे असायची आणि तेच या वस्त्रांची वर्षभर देखभाल करत असत.

तब्बल ५ तास चालणाऱ्या या मिरवणुकीवेळी लेझीम खेळाला जात. याचबरोबर दानपट्टा आणि तलवारबाजी देखील केली जात. जुन्या गावात हि मिरवणूक निघत असल्याने आताचे जुने राममंदिर, रथचौक, सुभाष चौक, धर्मशाळा, शनिपेठ, बालाजी मंदीर,पुन्हा रथ चौक असा या मिरवणुकीचा मार्ग असे. १९६० ते २००३ या काळात ही मिरवणूक निघायची. याठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित लोक येत असे. हजारांहून अधिक नागरिक या ठिकाणी येत असे. लोकवर्गणीने हि मिरवुक निघत असे. त्याकाळी फक्त ८०० रुपयात अक्खी निवणूक निघत असे.

---Advertisement---

शिवाजीनगरमध्ये ही अशा प्रकारची शिवजयंती साजरी होत असे. भोईटे गाडी येथील मिरवणूक पार पडल्यावर शिवाजी नगरची मिरवणूक निघत असे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---