⁠ 
रविवार, मे 12, 2024

अण्णा गटाची भोईटे गटविरुद्ध तक्रार : १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ ।  शहरातील मविप्र संस्थेचा ताबा घेण्यावरून झालेल्या हाणामारीप्रकरणी महेश पाटील यांच्या फिर्यादीवरून भोईटे गटाच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कुवारखेडा येथील रहिवासी तथा मविप्रचे संचालक महेश आनंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२७ रोजी दुपारी १ वाजता नेहमीप्रमाणे ते संस्थेच्या कार्यालयात गेले होते.

दि.३० रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत चर्चा सुरू असताना निलेश रणजीत भोईटे, शिवाजी केशव भोईटे, निळकंठ शंकर काटकर, प्रकाश आनंदा पाटील, योगेश रणजित भोईटे, गणेश दगडू धुमाळ, रमेश दगडू धुमाळ, पुण्यप्रताप दयाराम पाटील, संजय भिमराव निंबाळकर, सुनील भोईटे यांच्यासह १० ते १२ जण कार्यालयात घुसले व आरडाओरडा करून शिवीगाळ करू लागले. गोंधळ ऐकून मनोज पाटील, पियुष पाटील, शांताराम सोनवणे असे बाहेर आले. यावेळी ते अंगावर धावून आले आणि जमिनीवर पाडून लाठ्याकाठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आमच्यातील एकाने पोलिसांचे नाव घेतल्याने ते बाहेर पळाले व इकडे तिकडे दगड फेकू लागले. दगडफेकीत बाहेर उभ्या असलेल्या चारचाकीचे काच फुटले. जिल्हापेठ पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.