अडावद : अडावद पोलिस स्टेशन आणि शहर युवा मंच यांच्यातर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला सपोनि किरण दांडगे यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले.सपोनि दांडगे म्हणाले की,शाहू महाराज यांनी अनुकूल परिस्थितीत सामाजिक कार्य केलं,सर्व समाजाला एकत्र करून एक समाज एक राज्य हा विचार तत्कालीन काळात रयतेला दिला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आणि वसा जपण्याचं कार्य त्यांनी केले.आज च्या युवकांचे राजर्षी शाहू महाराज हे आदर्श असले पाहिजे जेणेकरून अनुकूल परिस्थितीत ही यशस्वी होता येत याच ज्वलंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज आहेत,असे प्रतिपादन त्यांनी केले.याप्रसंगी शांताराम पवार गुरुजी,मनोहर पंडितराव देशमुख,रियाज शेख,गणेशसिंह परदेशी,जितेंद्रसिंह परदेशी,हेमंत नेवे,कैलास बारी,पांडुरंग महाजन,जगदीश सोनार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर युवा मंच चे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले.सुत्रसंचालन अतुल महाजन तर आभार भुषण पाटील यांनी मानले.
अडावद पोलिस स्टेशन आणि शहर युवा मंच तर्फे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
Written By Tushar Bhambare