तरुणाच्या खुनामुळे चाळीसगाव शहर हादरले

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । मकर संक्रांतीच्या दिवशीच रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास चाळीसगाव शहर खुनाने हादररलें. तरुणाचा खून झाल्याची थरारक घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली. (murder in chalisgao)

चाळीसगाव शहरातील पवारवाडीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरूणाचा आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास खून झाला. पोतदार शाळेजवळ हा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली.या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दिनेश पवार (भावडू) (वय ३५) रा. पवार वाडी, चाळीसगाव असे मयत तरुणाचा नाव असल्याचे समजले. (dinesh pawar murder chalisgaon)

या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ह्या खूनचा कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस याची कसून चौकशी सुरू केली आहे. तत्पूर्वी एकीकडे मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असताना ह्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.