⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | दुर्दैवी ! पुतण्याच्या लग्नाच्यादिवशी काकांचा मृत्यू

दुर्दैवी ! पुतण्याच्या लग्नाच्यादिवशी काकांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. पुतण्याच्या लग्नाच्या दिवशीच सकाळी माेठ्या काकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनेमुळे लग्नाचा आनंद पसरलेल्या घरात क्षणात दु:खाचे सावट पसरले. ओमप्रकाश नवरंगमल चंदने (वय ७२) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, वधु-वरास हळद लागलेली असल्याने सकाळी लग्नसाेहळा झाला. तर संध्याकाळी काकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाचे वृत्त कळताच लग्न मंडपावर शाेककळा पसरली.

वरणगाव येथील माजी सरपंच सतीश चंदने यांच्या परिवारात मंगळवारी सूरज चंदने याचा लग्न सोहळा हाेता. परंतु पहाटे सहा वाजता सूरजचे माेठे काका ओमप्रकाश चंदने यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाचा आनंद पसरलेल्या घरात क्षणात दु:खाचे सावट पसरले.

वधू-वराला हळद लागलेली असल्याने परंपरेने लग्न पुढेही ढकलले जावू शकत नव्हते. त्यामुळे दु:खाचा डाेंगर निर्माण झालेला असताना चंदने कुटुंबीयांनी निर्णय घेत सकाळी साडेअकरा वाजता लग्नविधी पूर्ण केले. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ओमप्रकाश चंदने यांच्यावर येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.