⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदतीचे वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । तालुक्यातील आत्महत्या केलेल्या सहा शेतकर्यांच्या वारसांना शनिवारी तहसील कार्यालयात आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते सानुग्रह मदतीचे वाटप केले.

जामनेर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ योजनेमधून एक लाखाचा धनादेश  माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते जामनेर तहसील कार्यालयात  तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर, जामनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या वारसांना 70 हजार रुपये एक वर्षासाठी फिक्स डिपॉझिट चा चेक तर तीस हजार सानुग्रह अनुदान असे एक लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मागील वर्षी 50 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ योजनेतून मदत देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच जामनेर तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबांना आर्थिक लाभाची मदत ही एक महिन्याच्या आत तात्काळ मंजूर करण्यात येत असल्याची माहिती दिली तसेच नाम फाउंडेशन मार्फत 25 हजार रुपयांचा धनादेश मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश शेवाळे यांनी दिली.

यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या नंतर त्यांच्या कुटुंबांना शासनातर्फे समजविण्याचा प्रयत्न होत असून आत्महत्या होण्याअगोदर प्रत्येक कुटुंबाला मदत व्हावी व शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटातून आणि विजेच्या संकटामुळे हिरावून घेतला जात आहे यामुळे शेतकरी जास्त कर्जबाजारी होत आहे यावेळी आमदार महाजन यांनी आपल्या शेतातील किस्सा उपस्थितांना सांगितला साडेतीन लाख रुपये खर्च करून फक्त एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न निघाले यामुळे शेतकरी अडचणीत येत असून शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे निर्णय घेऊ नये संकटांना सामोरे जावे असे आव्हान यावेळी केले.

धनादेश वाटप प्रसंगी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारस यांना यावेळी आपल्या भावना अनावर झाल्याने आसवांना वाट मोकळी करून दिली यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे वारस यांना आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आले संजय भगवान राजपूत (शहापुर),योगेश सदाशिव धुंदाले (सामरोद ),आसाराम रानू जोशी (कुंभारी), अनिता गजानन कोळी (बोरगाव), विकास भगवान नापते (खांडवा), गजानन विश्वनाथ उगले (बेटावद खुर्द) या मयतांच्या वारसांना प्रत्येकी १ लाखाची मदत देण्यात आली. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, नायब ततहसीलदार प्रशांत निंबोळकर,उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, महेंद्र बाविस्कर राजू पाटील जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस तसेच पत्रकार उपस्थित होते