---Advertisement---
जळगाव शहर नोकरी संधी

पोरांनो तयारीला लागा! जळगाव जिल्हा परिषदेमार्फत होणार 619 जागांवर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । राज्यातील बेरोजगार युवकांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील रिक्त पदांवर लवकर भरती होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेमार्फत एकूण 619 जागांवर भरती होणार आहे. वर्ग तीनच्या विविध जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सरळसेवेतून ऑनलाइन परीक्षा होऊन आयबीपीएस कंपनीला परीक्षेचे कार्य देण्यात आले आहे. राज्यभरातील भरतीचे नियंत्रण पुणे जिल्हा परिषद अंतर्गत केले जाणार आहे.

zp jalgaon jpg webp

कोणते पदे रिक्त आहेत?
आरोग्य सेवक महिला २९१, आरोग्य सेवक पुरुष ७४, कंत्राटी ग्रामसेवक ५८, कनिष्ठ सहायक (लिपिक) २८, पशुधन पर्यवेक्षक २६, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ५०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४२, औषध निर्माण अधिकारी १०, पर्यवेक्षिका ९, पेसा क्षेत्रातील ११ विविध पदे भरली जाणार आहे.

---Advertisement---

भरतीसाठी पदे मंजूर झाली असली तरी या विषयीची अधिसूचना अद्यापही प्राप्त नाही. यासह वेळापत्रकही अद्याप जाहीर केलेले नाही. राज्यभरात एकाच वेळी ही भरती प्रक्रिया होणार असल्याचं समजतेय?

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहाय्यकपदासाठी आता किमान पदवी आवश्यक असणार आहे. या आधी बारावी उत्तीर्णची भरती होत होती. त्यात बदल करण्यात आला असून, नियुक्तीसाठी पदवी ही शैक्षणिक अर्हता आवश्यक करण्यात आल्याची राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

यासह या पदासाठी किमान ३० शब्द प्रतिमिनिट मराठी टंकलेखन किंवा ४० प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचे संगणक प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. कनिष्ठ साहाय्यक पदावरील नियुक्तीसाठी पदोन्नतीने ४० टक्के, अनुकंपा तत्वावरील ५० टक्के व वाहनचालक यांना कायमस्वरूपी बदलीने १० टक्के प्रमाण लागू राहणार आहे. जिल्हा परिषदेत आगामी भरतीत कनिष्ठ सहाय्यकाची २८ पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---