ZP Election : फडणवीसांमुळेच ओबीसी आरक्षण गेले – एकनाथराव खडसें
जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । ओबीसी समाजाला निवडणुकी आम्ही प्राधान्य देणार असं जरी भाजपा म्हटल असले तरी फडणवीस यांच्यामुळेच किंबहुना ज्याप्रकारे त्यांनी ओबीसीच घोंगड भिजत घातल त्यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना केला. तर दुसरीकडे पक्षांनी जरी ठरवलं की ओबीसींना त्यांच्या हक्काच्या जागा द्यायच्या तरी हे केवळ आत्मिक समाधान असणार आहे. हा काही कायमस्वरूपी तोडगा नाही असे हि ते म्हणाले.
यावेळी बोलताना एकनाथराव खडसे असेही म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मेळावे किंबहुना इतर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी स्वतः त्या कालखंडात विधिमंडळामध्ये पक्षविरोधी भूमिका घेतली होती. फडणवीस यांनी तात्काळ निर्णय न घेतल्याने ओबीसी आरक्षणच नव्हे तर मुस्लिम आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील अजून मार्गी लागलेला नाही. आज भारतीय जनता पक्ष किंबहुना देवेंद्र फडणवीस जरी ओबीसी समाजाच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत असं म्हणत असले तरी त्यांनी केलेल्या चुकांमुळे ओबीसींचे आरक्षण गेल आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही.
जिल्हापरिषद निवडणुकीसंदर्भात एकनाथराव खडसे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये येत्या काळात काय होईल ? जिल्हा परिषदेचा निकाल कसा असेल ? याबाबत आता काहीही बोलणे अतिशय चुकीचे राहिली. जिल्हापरिषदेत महाविकास आघाडी होणार की नाही ? याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस एकटीच निवडणूक लाडावणार का ? याबाबतही कोणता निर्णय झालेला नाही. अजूनही गण आणि गट प्रस्थापित व्हायचे बाकी आहेत, यामुळे निकालासंदर्भात आता मी बोलू इच्छीत नाही. मात्र जर महाविकासआघाडी झाली तर नक्कीच याचा फायदा तिन्ही पक्षाना होईल, असे खडसेंनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी नक्की काय होत ? याची उत्सुकता संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मतदारांना किंबहुना नागरिकांना लागून राहिली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन असे म्हणाले होते की ‘सगळे जरी एकत्र आले तरी जळगाव जिल्हा परिषदेवर सत्ता भाजपाचीच सत्ता येणार’. शिवसेना स्वतः महायुती करण्यासाठी तयार आहे. मात्र ‘त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आला नाही’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना म्हणाले होते. तर आज एकनाथ खडसे यांनी जर महाविकास आघाडी झाली तर दिलदार चित्र वेगळे असेल असा विश्वास प्रकट केला आहे. गेल्या निवडणुकीवेळी एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्ष मध्ये होते. मात्र आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. जिल्हा परिषदेवर एकनाथराव खडसे यांचा चांगलाच दबदबा आहे. यामुळे खडसे राष्ट्रवादी मध्ये गेल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत नक्की काय होतं? ते पहायची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.