⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

कोरोनापाठोपाठ ‘या’ व्हायरसची देशात एन्ट्री ; काय आहेत लक्षणे?

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । जवळपास गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत असतानाचा तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, देशात कोरोनापाठोपाठ आता एका नव्या व्हायरसची एन्ट्री झालीय. केरळ राज्यात झिका व्हायरसचे जवळपास 13 रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे एका गर्भवती महिलेला या झिका व्हायरसची लागण झाली आहे.  

सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेष म्हणजे याची लागण बाळाला होण्याची देखील शक्यता असते. यादरम्यान बाळाला विविध आजार होण्याची देखील शक्यता असते.  हा झिका व्हायरस डासांमुळे होतो. झिका व्हायरचा डास नेहमी चांगल्या पाण्यात असतो. 

काय आहेत झिकाची लक्षणे?

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.

भरपूर पाणी प्या

झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट आैषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.