⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | गुंतवणुकीचे अमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या भुसावळच्या तरुणाला अटक

गुंतवणुकीचे अमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या भुसावळच्या तरुणाला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवीत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भुसावळच्या तरुणाचे सावदा पोलिसांनी मुस्कल्या आवळल्या. अनिकेत दत्तात्रय बऱ्हाटे (रा.भुसावळ) असं संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे की, शेअरमार्केटचे बनावट अॅप्लीकेशन बनवुन त्यात एका इसमाने ९ लाख ३५ हजारांची गुंतवणूक केली होती. कालांतराने त्या अॅप्लीकेशन मध्ये तक्रारदार यांची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांची फसवणुक झालेचे लक्षात आले.त्यानंतर भोपाल क्राईम ब्रेन्च येथे फसवणुक झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भोपाल क्राईम ब्रांचमधील कर्मचाऱ्यांनी तांत्रीक माहीतीच्या आधारावर बनावट अकाऊंट तयार करणारा संशयित अनिकेत बऱ्हाटेयाचा शोध घेतला. त्याचा सहभाग असल्याचे लक्षात येताच, तो सावदा येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथक सावदा येथे आल्यानंतर त्यांनी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी यांची भेट घेतली. त्यानंतर पोहेकॉ. उमेश पाटील, यशवंत टहाकळे, राजेद्र वैदकर व भोपाळ क्राइम ब्रँच येथील पथकाने अनिकेत बऱ्हाटे याला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.