जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । दुचाकीवरून जाणार्या ३५ वर्षीय तरुणाला ट्रकने जबर धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल नजीक घडली. अजय सुरेश आठवाणी (३५, रा.शिवशक्ती अपार्टमेंट, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) असे मयताचे नाव असून याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अजय आठवाणी (टप्पी सेठ) हा दुचाकीवरून येत असताना भरधाव ट्रक (ए.पी.०५ टी.एम.५१२९) ने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जमाव प्रचंड संतप्त झाला होता. या प्रकरणी प्रकाश रमेशलाल आठवाणी (भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख सरदार मस्तान (५४, मेन रोड, कांचीकचेरा क्रीडा, आंध्रप्रदेश) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.