जळगावात अवैध दारु विक्रेत्याच्या गोळीबारात जखमी कामगार तरुणाचा मृत्यू..

नोव्हेंबर 3, 2025 6:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अवैध दारुअड्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. यात अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान आज ३ नोव्हेंबरला मृत्यू झाला. राजन शेख रफिउल्ला (वय २०, रा उत्तर प्रदेश) असं मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Rajan Shaikh Rafiullah

या घटनेबाबत असे की, जळगाव शहराच्या एमआयडीसी अवैध दारू विक्री करणाऱ्याने किरकोळ वादातून कंपनीतील दोन कामगारांवर गोळीबार केला. ही घटना रविवारी रात्री एमआयडीसी, जी सेक्टर मधील कंपनीच्या बाहेर घडली. कंपनीत नाईट ड्युटीसाठी जाणारा कामगार सरफु शेख हा एका टपरीवर थांबला असता, दारू अड्डा चालवणारा एक इसम एका व्यक्तीला मारहाण करत होता. सरफु शेख याने हे पाहिले असता, दारू विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

​या मारहाणीनंतर सरफु शेख याने कंपनीत काम करणाऱ्या आपले दोन भाऊ, राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख (वय २६) यांना बोलावले. हे तिघे कंपनीबाहेर आले असता, दारू विक्रेत्याने त्यांना शिवीगाळ केली. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्याला गावठी पिस्तूल दिले. आरोपीने क्षणाचाही विलंब न लावता या कामगारांवर चार ते पाच गोळ्या झाडल्या.

​या गोळीबारात राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोघे गंभीर जखमी झाले व त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. यात उपचार सुरु असतांना आज राजन शेख रफिउल्ला याचा मृत्यू झाला. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून गेल्या तीन वर्षांपासून येथे कंपनीत कामाला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now