गुन्हेभुसावळ

Bhusawal : रेल्वे प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला; १३ मोबाइलसह छत्तीसगडचा संशयित जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ रेल्वे स्थानकावरील सीपीडीएस (CPDS) पथकाने धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल १३ मोबाइल जप्त करण्यात आले असून, या मोबाइलची एकूण किंमत २ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे. अंकित साहू ऊर्फ दीपक साहू (वय २५, रा. छत्तीसगड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

४ ऑक्टोबर रोजी सीपीडीएस पथकातील एएसआय महेंद्र कुशवाहा व भुसावळ स्थानकावर ड्युटीवर असलेले एएसआय एस. जे. दुबे यांना पुणे-दानापूर ०१४४९ मधील प्रवाशाचा मोबाइल चोरीची माहिती मिळाली. त्यानंतर भुसावळ स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित दिसला.

त्यानुसार मलकापूर स्थानकावरील एएसआय वीरपाल सिंह तसेच गणेश जकाते आणि गोविंद सिंह यांनी समन्वय साधून मलकापूर येथे संशयिताला ताब्यात घेतले. त्याला भुसावळ आणून चौकशी केली असता त्याच्या बॅगेत २ लाख ९७हजार ५०० रुपयांचे १३ मोबाइल आढळले. त्याने हे सर्व मोबाईल दोन दिवसात भुसावळ ते मलकापूरदरम्यान धावणाऱ्या रेल्वेतून चोरल्याची कबुली दिली. दरम्यान तपासातून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button