⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगावच्या तरुणाची आंतरराष्ट्रीय संशोधक पदापर्यंत भरारी

चाळीसगावच्या तरुणाची आंतरराष्ट्रीय संशोधक पदापर्यंत भरारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : ६ मार्च २०२३ : चाळीसगाव येथील तरुण पार्थ पवार याने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिखर गाठत आंतरराष्ट्रीय पातळीवरील दक्षिण एशिया संशोधन केंद्रात संशोधक पदापर्यंतची भरारी घेतली आहे. जगात भाताचे पीक घेताना त्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असते. या यांत्रिकीकरणाचे संशोधन करून नवनवीन मशिन आणण्याचे संशोधन या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत होणार आहे. पार्थच्या या यशाने खान्देशचा झेंडा संशोधन क्षेत्रात फडकला आहे.

दक्षिण आशिया या संस्थेचे जगात सहा संशोधन केंद्रे असून, त्यात भारतातील त्याचे मुख्यालय वाराणसी येथे एक केंद्र आहे. त्यात केद्रांतर्गत भारत, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांचा समावेश आहे. फॉम मशिनरीचे यांत्रिकरणाचे संशोधन केले जाणार आहे. पार्थ यांची दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र, वाराणसी या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. पार्थ पवार यांनी एम टेक. महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी, उदयपूर येथून पूर्ण केले आहे. सध्या ते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, गांधीनगर गुजराथ येथे कार्यरत आहेत.

पार्थ यांचे प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण चाळीसगाव येथे तर पुढील शिक्षण येथील उदयपूर (राजस्थान) येथे झाले. त्यानंतर गुजरात राज्यात नोकरीही केली आता त्यांची वाराणसी येथील दक्षिण एशिया केंद्रात संशोधक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते चाळीसगाव येथील रहिवासी तथा निवृत्त शासकीय लेखापरीक्षक राजेंद्रसिंग भावसिंग पवार व भारती राजेंद्रसिंग पवार यांचे सुपुत्र आहेत.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.