Chalisagaon : रेल्वेखाली सापडून तरुण ठार; तीन महिण्यापुर्वीच झाला होता विवाह

ऑगस्ट 3, 2025 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२५ । धावत्या रेल्वेखाली सापडून एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २ रोजी पहाटेच्या सुमारास कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानका दरम्यान उघडकीस आली. दुर्गेश भानुदास महाजन रा. कजगाव ता. भडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

durgesh

दुर्गेश महाजन याचे शिक्षण डी फार्मसी झाले आहे. शिक्षणानंतर दुर्गेश हा नाशिक येथे खाजगी कंपनीत नौकरीला होता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच दुर्गेश याचा विवाह झाला होता. दरम्यान कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / ४ / ६ नजीक धावत्या रेल्वेखाली दुर्गेशचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुर क्षेत्राचे पोलिस हवालदार लक्ष्मण पवार हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. दुर्गेश याचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण पवार, एपीआय शुभांगी ढगे हे करीत आहेत.

मृत दुर्गेश महाजन याच्या पश्चात आई, वडिल, एक लहान भाऊ असा परिवार आहे. अत्यंत मितभाषी व कष्टाळू दुर्गेश महाजन याच्या अकस्मात मृत्यूने कजगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now