---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

रात्री जेवणानंतर मुलगा झोपण्यासाठी खोलीत गेला, सकाळी उठविण्यासाठी वडील गेले अन्..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकी आली. तेजस धोंडू पाटील (वय-१९) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

kusumba news jpg webp

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला असून तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजस हा आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले. आणि झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला.

---Advertisement---

दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांचा धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, तेजसच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सदाब सय्यद करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---