जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । पबजी (PUBG) मोबाइल गेमच्या वेडापायी अनेक मुलांनी जीव गमावला आहे. दरम्यान, जामनेर शहरातमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जामनेर शहरातील दत्त मंदीर परिसरातील जहागीर दारवाडा येथील १९ वर्षीय तरुणीने पब्जी गेमच्या वेडापायी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. नम्रता पद्माकर पाटील (वय-१९) असे या मृत तरुणीचे नाव असून ती बारावीचे शिक्षण घेत होती. याबाबत जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, जामनेरमधील जहागीर दार वाडा येथील नम्रता पाटील ही आपल्या कुटुंबियांसह सोबत जैन डॉक्टर यांच्या घरात राहतात. आज १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी वडील पद्माकर पाटील हे बाहेर केले तर आई सांयकाळी वाकी रोडला घराच्या कामावर पाणी मारण्याचा कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी नम्रता ही पब्जी गेम खेळत असताना एका लेव्हल पर्यंत आली. व त्यावेळी तिने घरातील पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
सोबत आत्महत्या करण्यापुर्वी तीने सुसाईड नोट लिहून दिली असून “मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत असून यामध्ये माझ्या घरच्यांच्या कोणाचाही दोष नसल्याचा उल्लेख केला आहे. नम्रता पाटील ही नेहमी मोबाईल मध्ये असायची अशी माहिती घरच्यांकडून मिळाली. घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल करीत आहे.