जानवेत येथील युवकाने घेतला गळफास

सप्टेंबर 1, 2021 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । अमळनेर तालुक्यातील जानवे येथील २० वर्षीय युवकाने घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ३० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मनीष निंबा पाटील असे मृताचे नाव आहे. दरम्यानम, या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

याबाबत असे कि, जानवे येथील मनीष पाटील हा रात्री ९ वाजेच्या सुमारास घरून जेवण करून गावात कीर्तन ऐकायला जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. परंतू तो रात्री कीर्तन संपले तरी घरी आला नाही. म्हणून कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री ११ वाजेच्या सुमारास घराशेजारील गोठ्यात दोरीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now