बहिणीला भेटून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू, दोघे जखमी

जून 22, 2021 10:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जून २०२१ । बहिणीला भेटून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वराचा भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी पहूर-चिलगाव रस्त्यावरील सांगवी गावाजवळ घडली. निवृत्ती उखर्डू सुतार ( वय-५०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या अपघातात एका बकरीचाही मृत्यू झाला असून दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

be0bcbdb 9158 4f2a bcab 670 (1)

याबाबत असे की, सांगवी गावाजवळ उभारण्यात आलेल्या चुकीच्या पुलामुळे समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने (एमएच १९, ३१५३ ) पहूर कडून चिलगावकडे जाणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. यात मोटर सायकलस्वार निवृत्ती सुतार यांचा जागीच मृत्यू झाला. 

मयत निवृत्ती सुतार हे कापुसवाडी (ता. जामनेर) येथून त्यांच्या बहिणीला भेटून आपल्या मोठ्या भावासह मोटरसायकलने (एमएच १९ बीके ४८८७ ) चिलगांवकडे जात असताना समोरून पहूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्याचे मोठे भाऊ वामन उखर्डू सुतार (वय ५५ ) रा. चिलगांव यांच्यासह रस्त्याच्या कडेला बकऱ्या चारणाऱ्या जामराबाई बाबु तडवी , रा सांगवी या जखमी झाल्या असून त्या चारत असणाऱ्या बकरं पैकी एक बकरी जागीच ठार झाली तर दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत . जखमींना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले . घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक घटनास्थळी दाखल झाले . या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now