जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२१ । शहरातील खोटेनगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचा निमखेडी शिवारात गिरणा पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ११.३० च्या सुमारास घडली.
खोटेनगर परिसरात राहणारा शुभम हिरालाल राजपूत (पाटील) वय-२६ हा तरुण शनिवारी सकाळी निमखेडी शिवारात गिरणा नदीत अंघोळीला गेला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना ११.३० च्या सुमारास घडला. जिल्हा रुग्णालयात त्याला आणले असता सीएमओ डॉ.विसपुते यांनी मृत घोषित केले.
दरम्यान, तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असता नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.