तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । शहरातील अश्विन भरतकुमार जांगडा (वय २४,) याची औरंगाबादहून जळगावला घरी येत असताना अचानक मध्यरात्री छातीत वेदना होऊन हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. हा कुटुंबात एकूलता मुलगा असल्याने जांगडा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर असे की, अश्विनला औरंगाबाद येथे असतांना अचानक त्रास सुरु झाला. बुधवारी त्याने याबाबत वडिलांशी चर्चा केली. वडिलांनी त्याला उपचारासाठी जळगावला बोलावून घेतल्याने तो रात्री काम आटोपल्यानंतर जळगावकडे यायला निघाला असताना मध्यरात्री सिल्लोडपासून काही अंतरावर आल्यानंतर त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्याने चालकाला याची माहिती दिली. सिल्लोड येथील दवाखान्यात नेण्यात आले, मात्र त्याचा श्वास थांबला होता.

गुरुवारी सकाळी आकाशवाणी चौकातील एका खासगी रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. दुपारी त्याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई रश्मी व वडील भरतकुमार जांगीड असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -